बटाटा वडा
Labels: Marathi- साहित्यः
- बटाटे - ३
- उकडलेले बेसन पीठ
- १ वाटीकांदा
- बडिशेप - १/२ चमचा
- आले-लसुण पेस्ट - १ चमचा
- हिरव्या मिरच्या - २
- ओवा - १/४ चमचा
- लाल तिखट - १ चमचा
- हळद - १ चमचा
- कडिपत्ता - ४-५तेल तळण्यासाठी
- मिठ चवीनुसार
- २ हिरव्या मिरच्या आणि लसुणची चटणी सजावटीसाठी
- कृती:
- १. कांदा बारीक चिरुन घ्यावा. उकडलेले बटाटे हाताने कुस्करुन घ्यावेत.
- २. हिरव्या मिरच्या व बडिशेप मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे.
- ३. कढईत २ चमचे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात कडिपत्ता टाकावा.
- ४. कडिपत्ता थोडा तळला गेल्यावर त्यावर कांदा २-३ मिनिट परतुन घ्यावा.
- ५. त्यामधे हळद, आले-लसुण पेस्ट व हिरवी मिरची-बडिशेप टाकुन परतावे.
- ६. २ मिनिट हे परतल्यावर त्यात बटाटा टाकावा.
- ७. त्यात चवीनुसार मिठ व थोडी कोथींबीर बारीक चिरुन टाकवी. निट मिक्स करुन २-३ मिनिट झाकुन ठेवावे. थोड्या वेळाने गॅस बंद करावा.
- ८. दुसर्या भांड्यामधे १ वाटी बेसन, ओवा, लाल तिखट, हळद व चवीनुसार मिठ टाकावे. आपण भजी करताना batter बनवतो, त्याप्रमाणे ह्याचे batter बनवुन घ्यावे. batter तळल्यानंतर crispy होण्यासाठी ह्यात १ चमचा गरम तेल किंवा १ चिमटी खायचा सोडा टाकावा.
- ९. हे करत असताना दुसर्या कढईत तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे.
- १०. बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करुन घ्यावेत व त्याला वड्यांचा आकार द्यावा. प्रत्येक वडा बेसनाच्या batter मधे बुडवुन त़ळुन घ्यावा.
- ११. हे वडे तळलेली मिरची किंवा लसुणची चटणी ह्यासोबत गरम serve करावा
ठाण्याचा सांस्कृतिक ठेवा : मामलेदार ची प्रसिध्द मिसळ
Labels: Marathiसाहित्य -
कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,१ बोटभर आल्याचा तुकडा
तेल १.५वाट्या,तिखट १.५वाटी,गरम मसाला ४ चमचे
१०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाण
चवीनुसार मीठ
कृती -
हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण व आले वाटून पेस्ट करावी,उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.
पापडी कुटून घ्यावी व पाण्यात भिजत घालावी.
एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेला लसुण घालून परतावे. १.५ वाटी तिखटातील ३/४ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.पाणी घालून उकळू द्यावे.
उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात बारीक चिरलेले २ कांदे घालून परतावे,उरलेले तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हे मिश्रण वेगळे ठेवावे.
वरुन घालायसाठी कांदे बारीक चिरावे,उकडलेले बटाटे चिरावे.
खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.
"जादा तिखा"- ३नं हवे असेल तर वेगळी तर्री वरुन घ्यावी.
वि.सू.
१.ह्या मिसळी बरोबर पाव चांगला लागतो ,पण दही ह्या मिसळी बरोबर खाऊन तिचा अपमान करू नये.नंतर ताक प्यावे.
अतिशय महत्त्वाचे:
२.दुकानातून फरसाण घेताना त्यात गोडसर पदार्थ उदा.बेदाणे,मक्याचा चिवडा इ. न घालण्यास सांगावे.
Subscribe to:
Comments (Atom)








