• Ea eam labores imperdiet, apeirian democritum ei nam, doming neglegentur ad vis. Ne malorum ceteros feugait quo, ius ea liber offendit placerat, est habemus aliquyam legendos id.
  • Ea eam labores imperdiet, apeirian democritum ei nam, doming neglegentur ad vis. Ne malorum ceteros feugait quo, ius ea liber offendit placerat, est habemus aliquyam legendos id.
  • Ea eam labores imperdiet, apeirian democritum ei nam, doming neglegentur ad vis. Ne malorum ceteros feugait quo, ius ea liber offendit placerat, est habemus aliquyam legendos id.
  • Lorem ipsum dolor sit amet

    Ea eam labores imperdiet, apeirian democritum ei nam, doming neglegentur ad vis. Ne malorum ceteros feugait quo, ius ea liber offendit placerat, est habemus aliquyam legendos id.

कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा रस्सा



तांबडा रस्सा :

साहित्य:
१) मटण १ किलो
२) आलं-लसूण १ चमचे
३) कांदा ४
४) तिखट
५) सुकं खोबरं १ वाटी
६) कोथिंबीर
७) भाजलेले तीळ १ चमचा
८) काजू वाटण अर्धा कप
९) खसखस १ चमचा
१०) मीठ चवीनुसार
११) वेलची २
२) धनेजिरे पूड २ चमच
१३) लवंगा ८
१४) दालचिनी ४
१५) मिरी ४
१६) हळद
१७) टोमॅटो प्युरी अर्धी वाटी
१८) तेल अर्धी वाटी


पूर्वतयारी: 

१. मटण स्वच्छ धुवून घेणे. थोडा कांदा बारीक चिरून उरलेला कांदा उभा चिरून तळून घेणे.
२. आलं-लसूण वाटून घेणे. तीळ भाजून घेणे. सुकं खोबरं किसून तळून घेणे.
३. खसखस भाजून घेणे. काजूचे वाटण करून घेणे.
४. कांदा-खोबरं, तीळ, खसखस, लवंग, दालचिनी, मिरी, वेलची मिक्सरमध्ये वाटून घेणे.

कृती:

१. कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून चिरलेला कांदा परतावा. त्यात आलं-लसूण लावलेलं मटण टाकून परतून घ्यावं.
२. हळद, टोमॅटो प्युरी, मीठ टाकून पाणी टाकून मटण शिजवून घ्यावं.
३. दुस-या पातेल्यात तेल टाकून कांदा-खोबरं वाटण परतून घ्यावं.
४. शिजलेलं मटण व काजू वाटण टाकावं.
५. जरूरीनुसार कांदामसाला व मीठ-तिखट चवीनुसार टाकून शेवटी कोथिंबीर टाकावी.
६. गरमागरम लाल रस्सा भात किंवा ब्रेडबरोबर खायला द्यावा.

टीप:
कोल्हापुरी कांदा मसाला असल्यास तो वापरू शकता.
________________________________________________

पांढरा रस्सा :
साहित्य:

१) अर्धा किलो मटण
२) वाटणासाठी-सुक खोबर अर्धी वाटी,
३) ३-४ लवंगा,
४) छोटा दालचिनीचा तुकडा,
५) एक चमचा खसखस,
६) २-३ मिर,
७) १०-१२ हिरव्या मिरच्या,
८) १ कांदा चिरलेला
९) २ चमचे आल लसुण पेस्ट.
१० ) १ अख्खा ओला नारळ.
११ )चवीपुरते मिठ.
१२ ) फोडणीसाठी-तेल,२ कांदे बारीक चिरलेले, तमालपत्र

कृती : 
१. मटण स्वच्छ धुवून त्याला मिठ आणि आल-लसुण पेस्ट लावून १५ मिनिटे ठेवावे.
२. नंतर प्रेशर कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करावे.
३. त्यात तमालपत्र अणी बारीक चिरलेला कांदा घालावा. कांद्याचा रंग गुलाबीसर झाल्यावर त्यात मटण घालावे. थोडा वेळ झाकण ठेवावे. मटणाला थोड पाणी सुटल्यावर मटणाचे पीस बुडेपर्यंत पाणी घालावे अणी ४ शिट्ट्या काढाव्यात.
४. मटण शिजेपर्यंत वरील वाटणासाठी दिलेले साहित्य एकत्र करून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे आणि ओल्या नारळाचे दुध काढून घ्यावे.
५ . एका पातेल्यात तेल गरम करावे. नंतर त्यात वाटण घालून छान परतून घ्यावे. वाटण भाजल्याचा वास अल्यावर त्यात शिजवलेले मटण घालावे. नारळाचे दुध घालून १ उकळ येऊ द्यावी.

मेथकुट





साहित्य:
२ वाट्या चणाडाळ
१/२ वाटी उडीद डाळ
१/४ वाटी मूगडाळ
१/४ वाटी तांदूळ
१/४ वाटी गहू
१ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
१ चमचा हिंग
१ चमचा सुंठ पावडर
१ चमचा लाल मोहोरी

.
कृती:
.
सर्व डाळी, गहू, तांदूळ मध्यम आचेवर वेगवेगळे व कोरडेच भाजावे.

लाल मोहोरी मूग डाळीबरोबर भाजावी.

हळद, हिंग, तिखट, सुंठ पावडर एकत्र करावी. कढई गरम करावी. गॅस बंद करावा आणि हे सर्व जिन्नस थोडे शेकवून काढावे.

भाजलेल्या डाळी, तांदूळ, गहू, मोहोरी एकत्र अगदी बारीक दळून आणावे. 

हळद, हिंग, तिखट, सुंठ पावडर यांचे मिश्रण दळून आणलेल्या पिठात निट मिक्स करावे.

मसाला चहा






.

नेहेमीचे चहा चे साहित्य
लवंग
इलीची / वेलदोडे
मसाला पावडर.
.
नेहेमी प्रमाणे चहा करा...आणि क्क्ष्हह शिजवताना..त्यात २ लवंग, १ वेलदोडा, किंवा चहाचा मसाला टाका.
आणि मस्त न्जोय करा...:)

कोफ्ता





साहित्य:
.
(२ )मध्यम शिजवून किसलेला बटाटा 
१ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ ते १/२ कप किसलेले पनीर
२ टेस्पून बारीक चिरलेला कांदा
१० ते १२ मनुके/बेदाणे (optional)
१ टेस्पून काजूचे तुकडे (optional)
१ हिरवी मिरची
१ टिस्पून बटर
तळण्यासाठी तेल
मिठ

.
कृती:
.
एका लहान कढई मध्यम आचेवर तापवून १ टिस्पून बटर घालावे.

त्यात २ टेस्पून चिरलेला कांदा घालून तो ब्राऊन होईस्तोवर परतावा.

नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काजूचे तुकडे, मनुके घालून १ मिनीट परतावे.

शेवटी पनीर आणि मिठ घालून थोडावेळ परतावे आणि हे मिश्रण एका छोट्या वाडग्यात काढावे. थोडे कोमट होवू द्यावे.

शिजवून किसलेले बटाटे, १ टेस्पून कॉर्न फ्लोअर आणि थोडे मिठ एकत्र करून निट मळून झाकून ठेवावे.

बटाट्याच्या मिश्रणाचे साधारण १० गोळे करावे (१ इंच).

प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून या मिश्रणाची पुरी लाटावी किंवा हातानेच मोदकासाठी करतो तशी पारी करावी.

त्यात आवश्यक तेवढे पनीरचे मिश्रण मध्यभागी ठेवून पुरी सर्व बाजूनी बंद करावी.

आणि हे कोफ्ते मध्यम आचेवर गोल्डन रंगावर तळून काढावे.
.
सॉस, हिरवी चटणी , लाल चटणी , किंवा चिंचेच्या चटणी बरोबर मस्त लागतात .

कोफ्ता करी





साहित्य:
.

३/४ कप कांदा पेस्ट (स्टेप १)
१/२ कप टॉमेटो प्युरी (स्टेप २)
१ टेस्पून आलेलसूण पेस्ट
१/२ टिस्पून गरम मसाला
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/४ कप दूध (होल मिल्क)
१ टेस्पून तेल
७-८ पनीरचे लहान तुकडे
मिठ
.
कृती:
.
साधारण २ कांदे प्रेशर कूकरमध्ये २-३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावेत. मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.

२ मोठे लालबुंद टॉमेटो शिजवून त्याची साले काढावीत, बिया काढून टाकाव्यात. मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावीत.

कढईत तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट परतावी. हळद, लाल तिखट घालावे व ढवळावे. नंतर कांद्याची पेस्ट घालून मंद आचेवर ५ मिनीटे वाफ काढावी.

नंतर टॉमेटो प्युरी घालून ढवळावे.धणेपूड आणि मिठ घालून मंद आचेवर कढई झाकून वाफ काढावी. शेवटी गरम मसाला टाकून वाफ काढावी.

अशी ग्रेव्ही तयार करून ठेवावी आणि कोफ्ते घालायच्या आधी त्यात दूध घालून मंद आचेवर ५ मिनीटे उकळवावे.

ग्रेव्ही मंद आचेवर गरम करावी व त्यात दूध घालून मिक्स करावे. कढईवर झाकण ठेवून ५ मिनीटे मंद आचेवर उकळू द्यावे, पनीरचे तुकडे घालावे.

तयार कोफ्ते सर्व्हींग प्लेटमध्ये ठेवावेत त्यावर गरम ग्रेव्ही घालावी. कोथिंबीर आणि द्राक्षं घालून सजवावे. नान, रोटी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.
.
TIP :- कोफ्ता करी करताना आधी करी करून घ्यावी. म्हणजे कोफ्ते नरम पडणार नाहीत.






बटर चिकन





साहित्यः

चिकन (Boneless) - २ Chicken breastsकांदा - १ बारीक चिरुन
टोमॅटो - ४ बारिक चिरुन
काजु १ तास पाण्यात भिजवुन - १०-१२
दही - ४ चमचे
आले-लसुण पेस्ट - ३ चमचे
तिखट -४ चमचे
हळद - २ चमचे
गरम मसाला - २ चमचे
चिकन तंदुरी मसाला - १ चमचा
काळी मिरी पावडर - २ चमचे
मोठी काळी वेलची - १
हिरवी वेलची - १
दालचिनी - १ छोटा तुकडा
तेजपान - २
काळी मिरी - ४-५
लवंग - ४-५
जिरे - १ चमचा
कसुरी मेथी - १ चमचा
Fresh cream - ४ चमचे
मध - २ चमचे
बटर - ३ चमचे
तेल - २ चमचे
मिठ चवीनुसार

कृती:
१. चिकन धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
२. चिकनला दही, १ चमचा आले-लसुण पेस्ट, तिखट २ चमचे, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, १ चमचा काळी मिरी पावडर, तंदुरी चिकन मसाला व चवीप्रमाणे मिठ घालुन १-२ तास marinate करावे.
३. चिकन १-२ तास मुरल्यावर ते Oven मधे भाजुन घ्यावेत.
४. दुसर्‍या कढई मधे तेल व बटर गरम करावे. त्यात सर्व आख्खा गरम मसाला टाकावा.
५. मसाला परतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा.
६. ते परतल्यावर त्या मधे आले-लसुण पेस्ट टा़कुन परतावे.
७. हे झाल्यावर त्या मधे हळद, तिखट, गरम मसाला, काळी मिरी पावडर टाकुन निट मिक्स करावे.
८. मसाल्याचे तेल सुटु लागल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व भिजवलेले काजु टाकुन मिक्स करावे.
९. त्यात चवीप्रमाणे मिठ व कसुरी मेथीची पुड करुन टाकावी व गॅस बंद करावा.
१०. आता ह्या तयार केलेल्या मसाल्याची मिक्सर मधे एकदम fine puree करुन घ्यावी.
११. ही puree गाळणी मधुन गाळावी.
१२. कढई मधे बटर गरम करावे. त्यात गाळलेली puree टाकावी.
१३. त्याला थोडी उकळी आल्यावर त्यामधे चिकनचे तयार केलेले तुकडे टाकावेत व झाकन ठेवुन १-२ मिनिट उकळी येउ द्यावी.
१४. सर्वात शेवटी त्यात क्रिम व मध टाकावे.
१५. तयार झालेले बटर चिकन प्लेट मधे काढुन, वरतुन क्रिम टाकुन गरम serve करावे.

टिपः

१. आवडत असल्यास चिकनचे तुकडे with bone घेउ शकता.
२. मसाला मिक्सर मधे बारीक करण्या आधी त्यातुन काळी वेलची काढुन टाकावी.
३. ह्या डिशला मधामुळे एक वेगळीच चव येते.
४. आवडत असल्यास तुम्ही ह्यात लाल रंग वापरु शकता.
५. शाकाहारी लोक चिकन एवजी पनीर वापरु शकतात.

सोल कढी:



साहित्य:

१० /१२ आमसुले, 

१ कप पाणी, 
१ नारळ, 
२/३ हिरव्या मिरच्या, 
३-४ लसूण पाकळ्या, 
पाव कप चिरलेली कोथिंबीर,
 मीठ 
साखर. 






कृती:

आमसुले पाण्यात एक तास भिज्वावीत, पाण्यातून आमसुले न कुस्करता काढून टाकावीत (कोकमाचे आगळ वापरले तरी चालते) नारळ खोऊन त्याचे दुध काढावे. मिरच्या लसूण कोथिंबीर एकत्र वटव. नंतर नारळाचे दुध, आमसुलाचे पाणी एकत्र करून त्यात वाटलेला मसाला, मीठ घालावे. कढीपत्त्याची पाने चिरून घालावीत

Amazon

 
World Cuisine | चवदार आणि चटकदार © 2010 | Designed by Chica Blogger | Back to top