ब्रेड मिक्स ऑमलेट
Labels: Marathiसाहित्य :
दोन अंडे,
अर्धा कांदा,
लाल मिरची,
मीठ,
तूप,
हिरवी कोथिंबीरपूर्वतयारी : कांदा बारीक कापून घ्यावा
कृती :
अंडे फोडून चांगले फेटून घ्यावे.
मीठ, मिरची पावडर, कापलेला कांदा व हिरवी कोथिंबीर त्यात मिसळावी.
दोन्ही ब्रेड हाताने चुरून अंड्याच्या द्रावणात मिसळावे.
चमच्याने फेटून मिश्रण एकजिनसी करावे.
नॉनस्टीक फ्राइंग पॅन गॅसवर ठेवून दोन चमचे तूप टाकावे.
तूप गरम होऊन चांगल्या प्रकारे पसरल्यानंतर मिक्स केलेले अंड्याचे द्रावण पॅनवर टाकून गोलाकार पसरावे.
थोडा वेळ शेकल्यानंतर वरून तूप लावून परतून घ्यावे.
दोन्ही बाजूने तांबूस होईपर्यंत शेकून घ्यावे.
तयार झालेल्या आम्लेटचे चार-पाच तुकडे करून टोमॅटो सॉस सोबत खायला द्यावे.
टोमॅटो मॅगी
Labels: Marathi.
साहित्य
.
१ मसाला maggi.
१ मोठा टोमाटो बारीक चिरलेला
फोडणीसाठी जिरे , मोहरी, तेल .
.
कृती
.
पातेलं गरम करून त्यात थोडं तेल घालावं.
तेल गरम झाल्यावर त्यात जिरे , मोहरी ची फोडणी द्यावी .
मग टोमाटो घालून चंगला परतून घ्यावा .
नेहेमी प्रमाणे दिढ कप पाणी घालून उकळी आणावी .
आणि मग maggi चे बारीक तुकडे करून पाण्यात घालावे .
नेहेमी प्रमाणे शिजवून सर्व्ह करावी.
.
तुम्ही कांदा हि वापरू शकता.
फक्त कांदा परतताना थोडे मीठ टाकावे म्हणजे कांद्याला देखील चव येईल .
फ्राईड राईस
Labels: Marathi.साहित्य
.
भात .
तेल
मीठ
मसाला / जिरे- धने पूड .
शिमला मिरची
कोबी
बटाटा
( सर्व भाज्या थोड्या मोठ्या आकारात कापून घ्याव्या )
.
कृती
.
एका कढई मध्ये तेल गरम करावं.
त्यात आधी बटाटा घालून परतून घ्यावा.
२ ३ मिनिटांनी शिमला मिरची घालून परतावी.
मग कोबी घालून पुन्हा थोडा वेळ परतावी.
भाज्या चांगल्या फ्राय होऊ पर्यंत त्या परताव्या.
तोपर्यंत भात सुट्टा करून घ्यावा .
भाज्या परतवून घेताना त्यात थोडे मीठ घालावे..म्हणजे भाज्यांना पण चव येईल..
भाज्या चांगल्या परतून झाल्यावर त्यात धने-जिरे पूड किंवा मसाला टाकावा.
२ मिनिटांनी कढईत भात घालून सर्व भाज्या त्यात व्यवस्तीत मिक्स करून घ्याव्यात.
पुन्हा चवीपुरते मीठ घालून परतावे.
मग कढईवर झाकण लाऊन मंद आचेवर्ती ठेवावे.
आणि ५ मिनिटांनी गरम गरम सेर्व्ह करावे.
.
भाज्यांमध्ये तुम्ही बीन्स , गाजर , मटार सुद्धा वापरू शकता.
चीज सँडविच
Labels: Marathiसाहित्य
.
२ ब्रेड स्लाईसेस
चीज स्लाईस / क्यूब
बटर
.
कृती
.
दोन्ही स्लाईसेस ना एके बाजूने बटर लाऊन घ्यावे.
एका स्लाईस च्या आतील बाजूवर चीज खिसून घालावे.
किंवा चीज स्लाईस ठेवावा.
त्यावरी २रा ब्रेड स्लाईस उलटा ठेवावा .
तुम्ही याला मायक्रोवेव/ ओव्हन मध्ये ग्रील करू शकता , तव्या वरती भाजू शकता किंवा मेकर मध्ये सुद्धा ग्रील करू शकता.
चीज मेल्ट झाला कि गरामा गरम सर्व्ह करावे.
आलू पराठा .
Labels: Marathi.
साहित्य
.
कणिक (चपाती साठी करतो ते )
उकडलेले बटाटे कापून घ्यावे
तेल
जिरे - मोहरी
बारीक कापलेल्या मिरच्या / लाल तिखट
सब्जी मसाला / धने -जिरे पूड
मीठ
साखर (चिमटभर)
( आलं पेस्ट , कांदा-बारीक कापलेला / लसून पेस्ट . )
.
कृती
कढईत तेल गरम करावं.
त्यात जिरे- मोहरी घालावे.
आलं - लसून पेस्ट / कांदा घालावा
मिरच्या टाकाव्यात.
छान परतून घ्यावं.
मग त्यात मटार घालून थोडा वेळ परतावं.
बटाटा घालून छान मिक्स करावं.
त्यात हळद, चिमटभर साखर , मीठ घालावा.
सब्जी मसाला घालून व्यवस्तीत मिक्स करावं.
सब्जी मसाला नसेल, तर लाल तिखट थोडे जास्त घालावे.
झाकण लाऊन ५ मिंट मंद आचेवर ठेवावे.
.
एका प्लेट मध्ये थोडी भाजी घेऊन त्याला कुस्करावे म्हणजे लाटताना सारण बाहेर येणार नाही.
आता कणकेचा गोळा घेऊन तो थोडा पसरट करून गोलाकार करावा आणि त्यामध्ये भाजी भरावी..
आणि त्याच तोंड बंद करावं.
लाटताना पीठ लाऊन लाटाव.
तव्यावरती तेल सोडावं आणि त्यावरती पराठा मिडीयम फ्लेम वरती भाजावा.
गरम गरम पराठा लोणचे , दही बरोबर सेर्व्ह करावे.
पराठ्या वरती मस्त अमूल बटर लावावे .
आमरस
Labels: Marathi.
साहित्य
.
२ ३ छान पिकलेले आंबे .
थोडसं गुळ / साखर
वेलची पूड
पाणी
.
कृती
.
आधी आंब्यांना हातात घेऊन अंगठ्यांनी दाबून मऊ करून घ्यावेत.
त्यानंतर देठा जवळील थोडंसं भाग काढून आंबा पिळावा.
एका पसरट पातेल्यात थोडंसं पाणी घ्यावं.
सालीला उलटं करून पाण्यामध्ये बुडवून साली वरचा गर काढावा.
कोयीचा गर पण काढावा.
सगळं रस एकत्र करून , त्याच्या गोडाच्या प्रमानावर्ती गुळ / साखर त्यात मिसळावे .
सेर्व्ह करायच्या वेळी त्यात वेलची पूड घालून मिक्क करावे.
.
टिप्स : साखरे ऐवजी गुळ वापरणे चांगले .
गुळ लगेच मिक्स व्हावा यासाठी गुळाला चाकूने कापावे..(बारीक पातळ स्लाईसेस काढाव्यात)
आंब्याचा रस मिक्सर मधून अजिबात काढू नये.हाताने केलेल्या आमरसाची चव वेगळीच येते.
आमरस बनवून थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून मग सेर्व्ह कलं तरी छान .
चपाती किंवा पुरी बरोबर सेर्व्ह करा.
सांबार
Labels: Marathi.
साहित्य
.
१ वाटी तूर डाळ
२ टोमाटो बारीक कापलेले
२ मोठे कांदे बारीक कापलेले.
जिरे
मोहरी
हिंग
तेल
मीठ
हळद
कडीपत्ता
लाल तिखट.
सांबार मसाला (अव्हरेस्ट )
थोडीशी साखर.
कोहळा (ऑप्शणल )
.
कृती
.
डाळ आणि टोमाटो कुकर मध्ये घालून ३ शिट्ट्या द्याव्यात.
डाळ शिजल्या नंतर रवी ने त्याला घुसळावे म्हणजे डाळ आणि पाणी एकजीव होतील आणि टोमाटो सुद्धा बारीक होईल.
मोठ्या पातेल्यात तेल गरम करून त्यात आधी जिरे ,मोहरी, कडीपत्ता मग कांदा घालून परतावे.
कोहळ्याचे थोड्या मोठ्या साईझ चे तुकडे घालावेत.
हिंग घालून मग डाळ घालून मिश्रण थोडावेळ गरम होऊ द्यावे.
मग हळद आणि २ चमचे सांबार मसाला टाकावा.
तुमच्या आवडीनुसार चमचमीत आणि तिखट सांबार हवे असेल, तर थोडा जास्त मसाला घालावा, किंवा तिखट घालावे.
चवीनुसार मीठ घालावे.
अर्धा टी स्पून साखर घालून उकळू द्यावे.
इडली , डोस्या बरोबर गरामा गरम सर्व्ह करावे.
सोयाबीन कटलेट
Labels: Marathiसाहित्य :
अर्धा कप सोया ग्रनुअल्स
अर्धा कप उकडलेले मुग
एक उकडलेला बटाटा
पाव कप बारीक चिरलेला कांदा
एक टी स्पून गरम मसाला
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ
थोडा रवा
तेल
कृती :
सोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या.
एका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
एका बाजूला नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून दाबून त्यांना कटलेट चा आकार द्या.
एका प्लेट मध्ये रवा पसरवा. त्या रव्यावर कटलेट ठेवून कटलेट दाबा म्हणजे रवा कटलेट ला चांगला लागेल. हा रवा कटलेट च्या दोनही बाजूना लावा.
गरम झालेल्या तव्यावर तेल टाकून हे कटलेट त्यावर दोनही बाजूने तांबूस होईपर्यंत भाजा.
हे गरमागरम कट्लेट कुठल्याही सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.
सोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या.
एका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
एका बाजूला नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून दाबून त्यांना कटलेट चा आकार द्या.
एका प्लेट मध्ये रवा पसरवा. त्या रव्यावर कटलेट ठेवून कटलेट दाबा म्हणजे रवा कटलेट ला चांगला लागेल. हा रवा कटलेट च्या दोनही बाजूना लावा.
गरम झालेल्या तव्यावर तेल टाकून हे कटलेट त्यावर दोनही बाजूने तांबूस होईपर्यंत भाजा.
हे गरमागरम कट्लेट कुठल्याही सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.
मसाला इडली
Labels: Marathiसाहित्य
.
इडली
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, तिळ, कडीपत्ता.
मीठ, तिखट.
खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी , कोरट्याची चटणी.
(तुम्हाला आवडते ती सुकी चटणी)
.
कृती
.
इडली कट करून तुकडे करून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, तिळ, कडीपत्ता घालून फोडणी तयार करा.
मग त्यात इडली चे तुकडे घालून मिक्स करा.
तुम्हाला हवी असेल ती चटणी भरपूर प्रमाणात घाला.
आणि मिक्स करा. थोडंसं मीठ घालून व्यवस्तीत एकजीव करून घ्या.
जास्ती तिखट आवडत असेल, तर लाल तिखटाचा वापर करू शकता.
२ मिनिट झाकण लाऊन मग गरम गरम सर्व्ह करा.
हा पदार्थ गरम गरम खाण्यातच मज्जा आहे.
टॉर्टिला चिप्स
Labels: Marathiसाहित्य :
एक वाटी मक्याचं पीठ , 2 टेबल स्पून कणीक, 1/2 टी स्पून चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट, 1 टी स्पून चाट मसाला, मोहनासाठी तेल, मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती :
सगळी पिठं मिक्स करा. तेलाचं मोहन अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, मसाले घाला. पाण्यात घट्ट भिजवून घ्या. अर्ध्या तासाने पोळी लाटून त्याचे पिझ्झासारखे तुकडे कापा. फोर्कने टोचून घ्या. थोडंसं सुकू द्या. तेलात तळून घ्या.
कैरीचा सालसा :
साहित्य :
कमी आंबट असलेली 1 कैरी, 1 मध्यम कांदा, तीन-चार लसूणपाकळ्या, मूठभर कोथिंबीर, चार-पाच भज्यांच्या मिरच्या, 1 टी स्पून ओरेगॅनो; मीठ, साखर, हवं असेल तर ऑलिव्ह ऑइल आणि 1 किसलेला चीज क्यूब.
कृती :
कैरी सालासकट अर्धी बारीक चिरा, अर्धी किसा. फोडी किंचित वाफवून घ्या. कांदा अगदी बारीक चिरा. लसूण आणि मिरच्या गॅसवर भाजून छान खमंग करून बारीक चिरा किंवा ठेचा. कोथिंबीर हातांनी तोडून बारीक करा. सगळं साहित्य नीट मिक्स करा. हवं असेल तर दोन टी स्पून ऑलिव्ह ऑइल घाला, मीठ-साखर घाला. टॉर्टिला चिप्सवर पसरवून खा. वाटल्यास चीज भुरभुरा.
साहित्य पाहिलं तर काय आहे- कैरीची चटणी आणि पोळी, पण एकदम ग्लॅमरस! टार्टिला चिप्स आणि कैरीचा सालसा एक मस्त इव्हिनिंग स्नॅक आहे.
Subscribe to:
Comments (Atom)

















