सोयाचिली



साहित्य-
.
सोया चंक्स (दोन कप)
सिमला मिरची दोन,
हिरवी मिरची दोन,
लाल सुकी मिरची (दोन चार),
बारीक चिरलेली कोथिंबीर-आलं-लसूण,
नॉरचं मंचुरीयमिक्स
तेल फ़ोडणीसाठी
.
कृती-
.
सोया चंक्स उकळत्या पाण्यात घालून दोन मिनिटं उकळावेत आणि थोडा वेळ तसेच झाकून ठेवावेत.

नंतर चाळणीत घालून त्यावर थंड पाणी ओतावं. कढईत तेल गरम करून पातळ काप केले सिमला मिरची-कांदा-आलं-लसूण-हिरवी मिरची बारीक चिरून-लाल मिरची घालून परतावं

आता त्यात सोया चंक्स घालावेत आणि तीन चार मिनिटं परतावेत.

नॉर मंचुरियन मिक्स घेऊन त्यात पाणी घालावं आणि ही पेस्ट कढईत घालून हलवत रहावं.

सगळ्या मिश्रणाला या पेस्टमध्ये चांगलं घोळवलं पाहिजे.

चवीपुरतं मीठ घालून गॅस बंद करा वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

0 टिपण्या:

Post a Comment

Amazon

 
World Cuisine | चवदार आणि चटकदार © 2010 | Designed by Chica Blogger | Back to top